सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीत खंडाळा येथे अवैध दारूविक्री करणाऱ्यावर धडक कारवाई
1 min readलोणावळा दि.३०:- लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की , लोणावळा शहर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खंडाळा येथे एक इसम घराचे आडोश्याला अवैध दारूची ओळखीच्या लोकांना विक्री करीत आहेत व त्यामुळे परिसरातील तरुण युवकांवर वाईट परिणाम होत आहेत. त्यावरून सहा.पोलीस अधीक्षक सत्यासाई कार्तीक यांनी शुक्रवार दि. 29 रोजी त्यांचे कार्यालयाकडील डीबी पथकाला मिळालेल्या बातमीचे ठिकाणी पाठवले. खंडाळा तालुका मावळ, जिल्हा पुणे येथे मिळाले बातमीच्या ठिकाणी इसम नामे अजय उर्फ बाबा जांभुळकर याचेवर छापा टाकला. छाप्यात त्याचे ताब्यातून एकूण 10,895/- रू. किमतीचा अवैध, विनापरवाना विक्री करण्यासाठी ठेवलेला दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. सदरबाबत पोलिसांनी दिलेल्या फिर्यदिवरून लोणावळा शहर पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास लोणावळा शहर पोलीस करत आहेत.सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक, सपोनि सचिन राऊळ, पोसई शुभम चव्हाण, पोसई भारत भोसले, पोहवा नितेश (बंटी) कवडे, पोकॉ रईस मुलानी यांचे पथकाने केली आहे.