घोडेगाव येथील बैलगाडा शर्यतीत ३६० प्रचंड बैलगाड्यांच्या सहभाग

1 min read

घोडेगाव दि.२८:-आंबेगाव तालुक्यातील प्रशासकीय कामकाज जेथे चालते त्या घोडेगाव शहरात सद्गुरू सेवा मंडळामार्फत सतत ४५ वर्ष यात्रा भरवत असुन दत्तजयंतीनिमित्त आयोजित भव्य बैलगाडा शर्यतीस ३६० बैलगाडा मालक सहभागी झाले आहेत २६ व २७ डिसेंबर रोजी स्पर्धा पार पडल्या. प्रेषकांच्या डोळ्यांची प्रारणे फेडण्यासाठी चित्तथरारक बैलगाडा शर्यत पहाण्यासाठी, आणि पहाडी आवाजाने स्पर्धेतील बैल आणि प्रेक्षकांच्या कानांवर धावते समालोचन करणारे समालोचक,

हजारो बैलगाडाशौकीन आणि व्यावसायिकांनी यात्रेत जान आणली. पहिल्या दिवशी घाटाचा राजा अप्पासाहेब साकोरे फुलगाव ११.१९ सेकंद तर आजचा घाटाचा राजा राजुशेठ जवळेकर वाफगाव यांचा मन्या बैल ११.१८ सेकंदासह ठरला.यात्रेस प्रा.सुरेखा निघोट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख,प्रा.अनिल निघोट मा.तालुका प्रमुख भारतीय विद्यार्थी सेना यांसह मान्यवरांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.यात्रेचे संयोजक सद्गुरू सेवा मंडळ घोडेगाव चे अध्यक्ष मा. सभापती कैलासबवा काळे उपाध्यक्ष विनोद कासार, सोमनाथ काळे बाजार समिती संचालक , सुनिल ईंदोरे ग्रा पं सदस्य, माऊली काळे, युवराज काळे,, गोविंद काळे, हरिश्चंद्र घोडेकर, गणेश घोडेकर यांनी तर सेकंद राजेंद्र पानसरे व निशाण कामकाज नवनाथ काळे यांनी पाहिले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे