चार महिने वाटचुकलेल्या वाटसरूला सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांचा आधार

1 min read

खामुंडी दि.२७:- खामुंडी (ता. जुन्नर )येथे एक इसम मानसिक रुग्णासारखे हावभाव करून फिरत असल्याचे येथील हॉटेल व्यवसाय करणारे केशव क्षीरसागर यांची पत्नी पुष्पा मुलगी निकिता आणी मुलगा ऋषिकेश क्षीरसागर याच्या निदर्शनास आले त्या इसमास ऐकू आणि व्यवस्थित बोलता येत नव्हते परंतु म्हणतात ना संकटात अडकलेल्यांना नेहमी कुणीतरी धावून येत असत अगदी तसच झाले. ऋषिकेशला देखील बोलता येत नाही तोच त्या इसमासाठी धावून आला त्याने त्याच्या बुद्धीचतुर्याने त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता विचारला त्याने त्याचे नाव कारभारी निलेश लक्ष्मण आणि गाव पारंगखार रोहा अलिबाग जवळ एवढंच सांगितल ऋषिकेशने त्या व्यक्तीचा फोटो आणि माहिती खामुंडी गावचे सामाजिक कार्यकर्ते कैलास बोडके यांना दिली. बोडके यांनी ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे उपनिरीक्षक अजित पाटील पोलीस हवलदार महेश पटारे यांना संपर्क साधून सर्व माहिती सांगितली त्याच बरोबर कैलास बोडके यांनी रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांचा मोबाईल नंबर शोधला आणि त्यांना देखील संपर्क साधून त्या व्यक्तीचा फोटो आणि माहिती पाठवल्यामुळे त्या व्यक्तीचा शोध लावण्यात बोडके यांना यश आले असून तो चार महिने झाले हरवला होता. रात्र जास्त झाल्यामुळे घरचे येणे लगेच शक्य नव्हते म्हणून बोडके यांनी त्याची जबाबदारी लालू महाले आणी केशव क्षीरसागर यांना सोपवली त्यांनी देखील त्याचा व्यवस्थित सांभाळ केला असून त्या व्यक्तीची आई, पोलीस कर्मचारी राजेंद्र कोंढार पोलीस पाटील दत्ताराम कांबळी यांच्या ताब्यात दिले आहे. बोडके यांचे सर्वच स्थरातून कौतुक होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे