कर्जुले हर्या मातोश्री हॉस्पिटलचा मोतीबिंदू मुक्त अभियान संकल्प; हॉस्पिटलच्या माध्यमातून गरोदर मातांसाठी मोफत प्रस्तुती सेवा

1 min read

कर्जुले हर्या दि.२७:- आरोग्य सेवेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात व पुणे जिल्ह्यात नावलौकिक होत असलेले पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री आयुर्वेद कॉलेज, हॉस्पिटल व रिसर्च सेंटर च्या माध्यमातून सर्वसामान्य रुग्णांसाठी वेळोवेळी मोफत व अत्यावश्यक सेवा दिली जात आहे ही समाजसेवा मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आहेर बंधू करत आहेत.कोरोना काळामध्ये मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून पारनेर, जुन्नर व संगमनेर तालुक्यातील अनेक रुग्णांना आधार देण्याचे काम झाले आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून दरवर्षी नवीन आरोग्य संकल्प करण्यात येत असतात.२०२३ वर्ष संपत आहे. परंतु २०२४ या वर्षाचे स्वागत करत असताना मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वसामान्य व गरीब रुग्णांसाठी विविध आरोग्य विषयक मोफत व अल्प दरात सेवा देण्यात येणार आहेत.

२०२४ मध्ये सुरुवातीपासूनच मातोश्री हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व अल्प दरात नेत्र शस्त्रक्रिया मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया अशा डोळ्याच्या विविध शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. व तसेच महिलांना मोफत प्रस्तुती सेवा हॉस्पिटलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आणि दर गुरुवारी मुळव्याध ग्रस्त रुग्णांसाठी तपासणी शिबिर व अल्प दरात जर्मन लेझर तंत्रज्ञानाद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. अशी माहिती मातोश्री शैक्षणिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष व मातोश्री हॉस्पिटलचे डॉ. दीपक आहेर यांनी दिली आहे. हॉस्पिटलच्या माध्यमातून मोतीबिंदू मुक्त समाज ही संकल्पना राबवण्यात येत आहे त्या माध्यमातून पारनेर तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नेत्र रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. खऱ्या अर्थाने हा उपक्रम नाविन्यपूर्ण आहे. नवीन वर्षाच्या शुभमुहूर्तावर मातोश्री हॉस्पिटल ने हा संकल्प केला असल्याने परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.

हॉस्पिटलच्या माध्यमातून गरोदर मातांसाठी मोफत प्रस्तुती सेवा मातोश्री आयुर्वेद हॉस्पिटल च्या माध्यमातून रुग्णांसाठी अनेक सामाजिक उपक्रम नेहमीच राबवली जात असतात पारनेर सारख्या ग्रामीण भागातील महिलांना लवकर उपचार प्राप्त व्हावेत व गरोदर काळात योग्य अशी सेवा मिळावी यासाठी हॉस्पिटल नेहमीच तत्पर राहिले आहे. २४ तास सेवा देऊन हॉस्पिटलने आता परिसरामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. महिलांना गरोदरपणा नंतर मोफत प्रस्तुती सेवा देऊन कर्जुले हर्या येथील मातोश्री हॉस्पिटलने एक आपली वेगळी सामाजिक ओळख निर्माण केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे