सावरगाव येथील नेत्र शिबिरात १७२ नागरिकांची तपासणी

1 min read

सावरगाव दि.२६:- (प्रतिनिधी : प्रा.सतिश शिंदे) सावरगाव (ता.जुन्नर) डिसेंट फाउंडेशन पुणे, ग्रामपंचायत सावरगाव, प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव आणि आर झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार (दि.२५) आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावरगाव, वडज, विठ्ठलवाडी, पारुंडे, बस्ती, निमगाव, निमदरी, खानापूर, धामणखेल, खिलारवाडी, चिंचोली व वडगाव सहानी या गावातील १७५ महिला आणि पुरुषांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३४ रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी पनवेल येथील शंकरा आय हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. या रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत होणार असून त्यांचे जाणे, येणे, राहणे व जेवण हे संपूर्ण मोफत असणार आहे.याप्रसंगी शंकरा आय हॉस्पिटलचे प्रतिनिधी प्रकाश पाटील, डॉक्टर नम्रता पवार , डिसेंट फाऊंडेशनचे सचिव फकीर आतार, सावरगावचे सरपंच दीपक बाळसराफ, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचेरे.आरोग्य सहाय्यक शिवपुत्र कोळी, आरोग्य सेवक सुनील पवार, आरोग्य सेविका मंगल गाडगे,विठ्ठलवाडी चे सरपंच आदिनाथ चव्हाण, वडज चे माजी सरपंच अजित चव्हाण,खानापूरचे सरपंच मुकुंद भगत,योगेश वाघचौरे, किरण गाढवे,उमेश जाधव,तान्हाजी जंदारे,विजय बामणे,अश्विनी पाटील,नंदिनी देवघरकर,रुचिका जंगम,विश्वनाथ पाटील,रामदास पवार, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे