मंगरुळच्या श्री साईगणेश कृपा पतसंस्थेचा २०२४ कॅलेंडर प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न
1 min read
मंगरूळ दि.२६:- श्री साईगणेश कृपा पतसंस्था मंगरुळ (ता.जुन्नर) संस्थेचा सन 2024 चे कॅलेंडर प्रकाशन सोहळा संस्थेच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या वेळी संस्थेचे चेअरमन निलेश लामखडे यांचा 8 व्यांदा LIC MDRT झाल्याबद्दल व गावच्या लोकनियुक्त सरपंच तारा लामखडे दैनिक पुण्यनगरी वृत्तपत्राने पुरस्कार दिल्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच ज्ञानदा मा. विद्यालय मंगरूळ शाळेचा निकाल 100 % निकालाची परंपरा कायम ठेवल्याबद्दल त्याच बरोबर मुख्याध्यापिका वारुळे रिटायर झाल्याबद्दल त्यांचा ही या वेळी सन्मान करण्यात आला. तसेच राहुल लामखडे फौजी यांच्या देशसेवेसाठी सत्कार करण्यात आला.
या वेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार उद्योजक संभाजी चव्हाण, उद्योजक, वैभव काळे, चेअरमन निलेश लामखडे, लोकनियुक्त संरपच तारा लामखडे, झापवाडी चे लोकनियुक्त संरपच सचिन उंडे, वारुळे मॅडम मुख्याध्यापिका ज्ञानदा मा. विद्यालय मंगरूळ, व्हा. चेअरमन खंडु खुटाळ, पिएसआय डोंगरे, काशिनाथ लामखडे, सखानाना लामखडे, माऊली पवार चेअरमन जय शंकर पतसंस्था.
शिवाजी लामखडे, शांताराम लामखडे संचालक तुकाराम लामखडे, बाळासाहेब लामखडे, बाबाजी कोरडे, दता लामखडे, ज्ञानदेव येवले, विक्रम लामखडे, अण्णासाहेब लबडे, गोपीनाथ लामखडे, सुनील वाजे, चंद्रशेखर भोजणे, सुनीता खराडे, मनिषा कोरडे, संपत लामखडे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, माधव बारेकर उपाध्यक्ष तंटामुक्त.
गोरख बाबा लामखडे, चंद्रकांत ढगे उपसरपंच, शिवाजी कोरडे, विजय कोरडे, श्री साईगणेश कृषी विज्ञान मंडळाचे अध्यक्ष संजय निवृत्ती मनसुख, स्वप्नवेध अनाथालय सचिन भोजणे, दता चौधरी, सुखदेव दादा गुंजाळ, विलास लामखडे, शिवाजी नायकोडी
उपस्थित होते. व्यवस्थापक कैलास / विलास लामखडे कार्यक्रम संचालन दत्तात्रय लामखडे यांनी केले.