बोतार्डे येथे वाघाचा बकरीवर हल्ला, हल्ल्यात बकरी जखमी

1 min read

बोतार्डे दि.२८:- जुन्नर तालुक्यातील बोतार्डे ता.जुन्नर जि.पुणे येथील तुकाराम रेवजी मरभळ यांच्या बकरीवर बुधवार दिनांक २७ रोजी सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान मिना नदीत बकर्‍या चरत असताना घनदाट झाडीत दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला.
दरम्यान या हल्ल्यात मरभळ हे जवळच बसलेले होते. मात्र बकरीवर दुरूनच हल्ला होताच जवळपास दहा फुटाच्या अंतरावर बकरीला ओढत नेत असताना त्यांनी स्वत: जवळची काठी फेकून मारली, त्यात वाघाने बकरीला सोडले व पळून गेला या हल्ल्यात बकरीच्या मानेवर दोन दात लागले असून मोठ्या प्रमाणात बकरी यात जखमी झाली आहे, प्रत्यक्षात वाघ पाहून मरभळ हे पुरते घाबरून गेले होते, मात्र त्यांनी हे जीवावरचे धाडस करून वाघाच्या जबड्यातून बकरीचे प्राण वाचविले असे ते सांगत होते.या नंतर मरभळ यांनी त्या बकरीला उचलून घरी आणले मात्र वाढते हल्ले पाहता वनविभागाने या गोष्टीची वेळीच दखल घेण्याची गरज असून आता दिवसाढवळ्यस जनावरांवर हल्ले होत आहेत मात्र यापुढे माणसांवर देखील हल्ले होतील तरी वनविभागाने यावर लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे असे देखील ते यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे