राजुरी बसस्टँड वर गतिरोधक टाकण्याची मागणी; वर्षभरात अनेक अपघात 

1 min read

राजुरी दि.२५ : राजुरी (ता. जुन्नर) येथील बस स्थानकाजवळ वर्षभरात अनेक अपघात झाले असल्याने गतिरोधक टाकण्यात यावा अशी मागणी माजी सभापती दीपक औटी, सरपंच प्रिया हाडवळे व उपसरपंच माऊली शेळके यांनी केली आहे.

राजुरी हे नगर-कल्याण या राष्ट्रीय महामार्गावरील वसलेले असून, या गावची लोकसंख्या पंधरा हजारांहून अधिक आहे. या ठिकाणी दोन शासकीय महाविद्यालये तसेच आंतराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन कृषी केंद्र तसेच या गावची स्मशान भूमी याच ठिकाणी असल्याने येथील बसस्थानकावर नेहमीच नागरिकांची गर्दी असते.

शनिवारी आठवडे बाजार असतो. राजुरी गावात येताना दोन्हीही बाजूने उतार असल्याने वाहनांचा वेग जास्त असल्याने या ठिकाणी नेहमी अपघात होऊन होतात.

दरम्यान येथील बस स्थानकावर गेल्या वर्षभरात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यामुळे दोन्हीही बाजूने गतिरोधक टाकण्यात यावा अशी होत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे