जुन्नर तालुक्यात फिरतायत हलक्या प्रतीची गॅस शेगडी विकणारे परप्रांतीय; जागरूक नागरिकांनी दिले पोलिसांच्या ताब्यात

1 min read

जुन्नर दि.२५:- जुन्नर शहरामध्ये बाहेरच्या राज्यातून येऊन हलक्या प्रतीची गॅस शेगडी कमी किंमतीमध्ये विकणारे परप्रांतीय तरुण जुन्नरमधील जागृत नागरिक व व्यापाऱ्यांनी ताब्यात घेऊन पुढील चौकशी करिता जुन्नर पोलिसांच्या ताब्यात दिले. हे परप्रांतीय तरुण जुन्नरमधील विविध भागात फिरून अशा गॅस शेगडींची विक्री घराघरात जाऊन महिलांना फसवून त्याची विक्री करीत असल्याची माहिती हेमंत साखला, दीपक सातपुते, आनंद सासवडे, भूषण पातूरकर, याकूब सय्यद, मनोज पातूरकर, महेंद्र तिवाटणे या व्यापारांनी एकास ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे