रोटरी क्लब ऑफ आळेफाटा घेऊन आले आहे, आजच्या पिढीचं खुसखुशीत मराठी नाटक; आजच तिकीट बुक करा
1 min readआळेफाटा दि.२४ :- परिसरातील शाळांमधील सर्व मुलांना चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या आरोग्यासाठी उत्तम सुविधा (टॉयलेट, आर.ओ. प्लॉट, खेळांचे साहित्य, स्मार्ट टि.व्ही. बेंचेस, ग्रंथालय, आर्थिक दुर्बल मुलांना, वह्या पुस्तके इत्यादी उपक्रम) मिळावी यासाठी रोटरी क्लबच्या माध्यमातून नेहमीच काम केले जाते.
यापुढील कामांना आर्थिक फंडाचे नियोजन करणे कामी क्लब तर्फे नाटकाचे आयोजन केले गेले आहे.
या नाटकामधून मिळणारा फंड वरील उपक्रमासांठी वापरण्यात येणार आहे. नक्कीच त्यातून मुलांना चांगल्या शिक्षणासाठी मोलाची मदत होणार आहे.
तरी या महानकार्यामध्ये आपण आम्हास सहकार्य करावे. हि आपणांस रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रलच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.
गौरी थिएटर निर्मित व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित या नाटकामध्ये संकर्षन कऱ्हाडे, अमृता देशमुख, प्रसाद बर्वे यांसह अनेक कलाकार आहेत.
या साठी १००० व २००० रुपये तिकीट दर असणार असून शुक्रवार दि. १२ जानेवारी २०२४ रोजी सायं. ६.०० वाजता विघ्नहर सांस्कृतिक भवन, ओझर, (ता. जुन्नर) येथे सादर होणार आहे.
अधिक माहितीसाठी अध्यक्ष विजयकुमार आहेर मो. ९८६०२३६५४२, उपाध्यक्ष संभाजी हाडवळे मो. ७५८८०६९४१२, संस्थापक महावीर पोखरणा ९४२३७५२४०८, खजिनदार विमलेश गांधी ९७३०३०८७८९ या नंबर वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.