बँक ऑफ इंडियाच्या वतीने बेल्ह्यातील महिलांना मार्गदर्शन
1 min readबेल्हे दि.२१:- बँक ऑफ इंडिया शाखा बेल्हे यांच्यावतीने महिला सक्षमीकरणासाठी बेल्हयात (ता.जुन्नर) बँक मेळावा आयोजित करण्यात आला.त्यामध्ये बँकेचे झोनल ऑफिसर उत्तम अढळ एस के वाय के इन्चार्ज यांनी कर्ज प्रस्ताव व सुरक्षा विमा याबद्दल सर्व महिलांना माहिती दिली.
तसेच बँक मॅनेजर श्रीपाद कुलकर्णी यांनी ही महिलांना कसं सक्षम होईल त्यासाठी बँकेकडून कशी मदत होईल याची सर्व माहिती सर्व महिलांना दिली. तसेच बँकेकडून गणेश पाटील असिस्टंट मॅनेजर यांनी झोनल ऍक्टिव्हिटी व सुरक्षा विमा यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी पंचायत समिती उमेद अभियानात काम करत असलेल्या निर्मला गाढवे प्रभाग समन्वयक यांचेही मोलाचे मार्गदर्शन मिळाले. तथास्तु ग्राम संघसचिव जमीला शेख, सीआरपी कांताबाई गटकळ, हिना शेख यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाची रूपरेषा तथास्तु ग्राम संघ कोषाध्यक्ष सायली वाघ चासकर यांनी सांभाळली.
गावचे उपसरपंच राजेंद्र पिंगट यांनी हे सहभाग दाखवला तसेच माजी सरपंच गोरक्ष वाघ यांनी ५०० महिलांचा विमा स्वतः वाघ यांच्याकडून उतरवून देतील असा शब्द महिलांना कार्यक्रमाच्या रूपात दिला. पाहुण्यांचे आभार व महिलांचे आभार मनोगत प्रभाग संघ सचिव स्नेहा निलेश बांगर यांनी व्यक्त केले.