वडीलांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सव्वा लाख रुपयांची देणगी
1 min read
निमगाव सावा दि.२१:- निमगाव सावा येथील रविंद्र दत्तात्रय गाडगे, अशोक दत्तात्रय गाडगे आणि शिवाजी दत्तात्रय गाडगे या तीन भावांनी आपले वडील स्वर्गवासी दत्तात्रय सदाशिव गाडगे यांच्या स्मरणार्थ गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला (निमगाव सावा ता.जुन्नर) अँड्रॉइड बोर्ड खरेदी करण्यासाठी तब्बल 1 लाख 25,000 रुपयांची देणगी दिली.
एकविसाव्या शतकात विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावे आणि शिक्षणानेच माणूस घडतो या भावनेतून या तिन्ही भावांनी ही देणगी देत समाजासाठी नवा आदर्श निर्माण केला आहे.गुणवत्ता पूर्ण शिक्षण देणारी आदर्श शाळा म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमगाव सावा या शाळेकडे पाहिले जाते.
प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे घडला पाहिजे त्याला गुणवत्तापूर्ण, दर्जेदार शिक्षण मिळाले पाहिजे अशी भावना या तिन्ही भावांनी व्यक्त केली.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष इरफान पटेल व सर्व सदस्य, पांडुरंग पतसंस्थेचे अध्यक्ष संदीपान पवार, निवृत्ती गाडगे व शिक्षक वृंद उपस्थित होते. मुख्याध्यापक लहू गोफने यांनी उपस्थितांचे आभार मानले.