शासकीय फी आकारून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे; आघाडी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष जुन्नर प्रमोद खांडगे पाटील यांची मागणी

1 min read

जुन्नर दि.२०:- शासकीय फी आकारून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी आघाडी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष यांनी तहसीलदार जुन्नर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मराठा समाजाला खूप अडचणींना व आर्थिक पळवणूकला सामोरे जावे लागत आहे.

मोडीवाचन वंशावळ जुळवून ने तहसीलदार कचेरी ऑफिस मधील रेकॉर्ड रूम दस्त चेक करणे प्रतिज्ञापत्र करून देणे. यासाठी तहसीलदार कचेरीने अधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे का? त्यासाठी मोडी वाचणारे मराठा समाजाकडून अधिकचे पैसे मागत आहेत. कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी नेम नेमका किती खर्च येत आहे.

त्याची मराठा समाजाला माहिती नाही. यावरील कारणामुळे मराठा समाजातील बांधवांचे मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत आहे ही पळून बंद झाली पाहिजे व शासकीय नियमाप्रमाणे असणारा खर्च मराठा समाजाकडून आकारून प्रमाणपत्र मिळावे. व कुणबी मराठा नोंदीची पीडीएफ तालुका भर फिरत आहे परंतु मोडी लिपी वाचक आवाजाच्या सव्वा रुपयांची मागणी करत आहेत.

शोधनावर सर्टिफिकेट साठी पैशाची मागणी करतात तरी आपण त्या पीडीएफ आपल्या पातळीवर अनुवाद करून आपणच आपल्या सही शिकणे सादर कराव्यात सदर गोष्टीसाठी होणारी व योग्य ती कारवाई करावी ही सर्व मराठा समाज बांधवांची मागणी आहे. त्यामुळे शासकीय घेऊनच कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे.

जर असे न झाल्यास व मराठी समाजाची कळवणूक चालूच राहिली तर शेतकरी संघटने कडून अशा अधिकाऱ्यांवर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे सूचित करण्यात येत आहे. यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा नेते अंबादास हांडे युवा आघाडी शेतकरी संघटनेचे सचिन थोरवे प्रवीण डोंगरे उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे