कल्याण- नगर महामार्गवर भीषण अपघात; रिक्षा,ट्रक, पिकअपचा तिहेरी अपघात, ८ जणांचा जागीच मृत्यू
1 min read
ओतूर दि.१८:- कल्याण- नगर महामार्गावर रविवार दि.१७ रात्री अकराच्या सुमारास भीषण अपघात झाला. ओतूर जवळील डिंगोरे येथील अंजिराची बाग परिसरात ट्रकने रिक्षा आणि पिकअपला जोरदार धडक दिली.
या तिहेरी अपघातात दोन चिमुकल्यांसह ८ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील ४ जणांचा समावेश आहे. गणेश मस्करे (वय ३०), कोमल मस्करे (वय २५ वर्ष ) हर्षद मस्करे (वय ४ वर्ष) काव्या मस्करे (वय ६ वर्ष) (सर्व राहणार मढ ता.जुन्नर) अशी मृतांची नावे आहेत. अन्य मृतांची नवे अद्याप समजली नाहीत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे पती, पत्नी आणि दोन लहान मुलांसह रिक्षाने प्रवास करीत होते.
यावेळी जुन्नर तालुक्यातील डिंगोरे गावाजवळील अंजिराची बाग येथे त्यांच्या रिक्षाला ट्रक आणि पिकअपने जोरदार धडक दिली.
अपघाताची माहिती मिळताच ओतूर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कांडगे व त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली.
हा अपघात इतका भीषण होता, की रिक्षाचा अक्षरश: चक्काचूर झाला. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. अपघाताचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.