दुचाकी स्वारांवर बिबट्याचा हल्ला; महिला जखमी

1 min read

ओतूर दि ५:- ओतूर (ता.जुन्नर) जवळील पाथरटवाडी येथील समीर घुले हे आपल्या पत्नी अश्विनी समीर घुले वय (वर्ष- 26) समवेत आपल्या मोटरसायकल वरून ओतूर येथे जात असताना सोमवार (दि.४) सायंकाळी ७ वाजता कॅनॉल लगत असलेल्या उसात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला करून किरकोळ जखमी केले.

सबंधित घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे, वनपाल ओतूर सुधाकर गीते, वनरक्षक विश्वनाथ बेले व फुलचंद खंडागळे यांचे समवेत विशाल घुले, सुधाकर घुले, अमोल गीते,

अजय मालकर यांनी जागेवर जाऊन पाहणी करून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र ओतूर येथे नेऊन उपचार करून पुढील उपचारासाठी जुन्नर पाठवण्यात आले.

ग्रामस्थांच्या मागणीनुसार वनविभागाने कॅनॉल लगत पिंजरा लावण्यात ची व्यवस्था करण्यात आली आहे.

ओतूर परिसर हा बिबट प्रवण क्षेत्र देत असल्याने ग्रामस्थांनी आपल्या घरासमोर लाईट लावणे, समूहाने फिरणे सोबत बॅटरी व मोबाईलवर गाणी वाजवणे आपले पशुधन सुरक्षित गोठ्यात ठेवणे.

तसेच बाहेरून आलेल्या मजुरांना व ऊसतोड मजूर यांना सुरक्षित निवाऱ्याची तसेच लाईटची व्यवस्था करण्यात यावी पण असे आवाहन वनविभागाकडुन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे