नाशिक- पुणे महामार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीत शिरला ट्रक; ३ वारकरी ठार, ९ जखमी
1 min readसंगमनेर दि.३:- शिर्डी येथील श्री महंत काशीकानंद महाराज यांची साई दिंडी आळंदी येथे जात असताना पुणे-नाशिक महामार्गवरील संगमनेर जवळील नांदूर खंदरमाळा फाटा येथे ट्रक दिंडीमध्ये घुसली.
अपघातात तीन वारकरी जागीच ठार तर नऊ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. आज दि.३ दुपारच्या दरम्यान घटना घडली. कार्तिकी वारीसाठी शिर्डीहून देवाची आळंदीकडे साईबाबा पालखी सोहळा हरिनामाच्या गजरात नाशिक – पुणे महामार्गावरून मार्गस्थ होताना एक ट्रक पाठिमागून थेट पालखीत घुसल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
अचानक वाहन दिंडीत घुसल्याने दिंडीतील वारकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. या अपघातात तीन वारकरी ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून ९ वारकरी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. जखमी व मृतांची नावे समजली नाहीत.