श्री जे.आर.गुंजाळ विद्यालयात वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

1 min read

आळेफाटा दि.१७:- श्री जे.आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल आळेफाटा (ता.जुन्नर) मध्ये वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला.विद्यालयात विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव या निमित्ताने करण्यात आला. मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रदीप गुंजाळ व सचिव मीना गुंजाळ यांनी विद्यार्थांना शुभेच्या दिल्या.या कार्यक्रमाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये रागिणी कराळे (पोलीस उपनिरीक्षक आळेफाटा), किसन अबुज (शिक्षण विस्तार अधिकारी), डॉ.शरद पारखे ( प्राचार्य कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, अळकूटी), श्री जालिंदर गागरे (सरपंच अंबी दुमाला) इ.मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू भोसले व सरिता लेंडे यांनी केले व आभार शबाना जमादार यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे प्राचार्य सतीश पाटील व उपप्राचार्य विठ्ठल म्हस्के तसेच सर्व शिक्षकांचे विशेष सहकार्य लाभले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे