समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि अर्णी ॲनालिटिकलमध्ये सामंजस्य करार

1 min read

बेल्हे दि.१६:- समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे अंतर्गत अर्णी ॲनालिटिकल लॅबोरेटरी चे डायरेक्टर मासूम देशमुख यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

सनफार्मासारख्या जनप्रसिद्द कंपनी मध्ये ते गेल्या १९ वर्षांहूनही अधिक काळ कार्यरत आहे. औषधनिर्माणशास्त्रात विविध साधनसामग्री व उपकरणांचा वापर संशोधनासाठी केला जातो व त्या उपकरणांची संरचना व त्याचा वापर याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.

समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मधून गेल्या वर्षी व याही वर्षी २०० हून अधिक विद्यार्थ्यांना इंडस्ट्री इंटर्नशिपसाठी फार्मा इंडस्ट्री मध्ये पाठविले जाते. या फार्माइंडस्ट्री मध्ये नोकऱ्यांच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. पण त्यासाठी उपकरणं हाताळण्याचे कौशल्य तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

नोकरीच्या संध्या भरपूर आहे परंतु मनासारखा पगार हवा असेल तर तुम्ही कौशल्यपूर्ण असणे खूप महत्वाचे आहे. विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जेवढे तुम्ही कौशल्यपूर्ण असणार तेवढे तुमचे उज्जवल भविष्य असणार.

गेल्या वर्षीपासून या अर्णी ॲनालिटिकल लॅबोरेटरी मध्ये विद्यार्थ्यांना विविध उपकरणांची संरचना व त्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. म्हणून हीच कौशल्य अवगत करून घेण्यासाठी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आणि अर्णी ॲनालिटिकल लॅबोरेटरी यामधे ५ वर्षांचा शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.बसवराज हतपक्की आणि प्रा.डॉ.कुलदीप वैद्य यांनी आयोजन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टूडेंट कौन्सिल चे सरचिटणीस वैष्णवी सहाणे यांनी प्रास्ताविक समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. बसवराज हतपक्की यांनी व आभार डॉ.कुलदीप वैद्य यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे