ओतूर येथील इंजीनियरिंग कॉलेजमधील क्यु स्पायडर ९ विद्यार्थ्यांची निवड

1 min read

ओतूर दि.१५- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजीनियरिंग डुंबरवाडी ओतूर येथील मंगळवार दिनांक १२ रोजी पुणे येथील क्यु स्पायडर कंपनीने कॅम्पस इंटरव्यूमध्ये ९ निवड करण्यात आली.पुणे येथील क्यू स्पायडर ही यंत्र सॉफ्टवेअर प्रा.लिमीटेड कंपनी असुन त्यांच्या भारतात बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद, पुणे, मुंबई, ठाणे, भोपाळ या ठिकाणी शाखा असुन भारताबाहेर यु के लंडन, युएस- कॅलीफोर्निया, इत्यादी १४ देशात शाखा आहेत. महाविद्यालयामध्ये प्लेसमेंटद्वारे दोन फेऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्रथम फेरीमध्ये ७२ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला त्यामध्ये अॅप्टीट्युट टेस्टद्वारे दुसऱ्या फेरीसाठी ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यामधुन १० विद्यार्थांची दुसऱ्या फेरीतून अंतिम निवड करण्यात आली. त्यामध्ये संगणक विभागाचे सिद्धी कुलकर्णी, नेहा शिंदे, शब्दाली थोरात, गौरी वेठेकर, साहिल शेख, श्रीकांत खोटे असे ७ विद्यार्थी तर मेकॅनिकल विभा गाचा मेहुल पुण्यार्थीं तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँन्ड टेली कम्युनिकेशन्स विभागाचे संकेत माने व अविनाश कड या २ विद्यार्थ्याची निवड झाली. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी यु खरात यांनी दिली.या कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विशाल तांबे, सचिव वैभव तांबे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी.यु खरात, संगणक विभाग प्रमुख डॉ सुनील खताळ, मेकॅनिकल विभागप्रमुख व महाविद्यालय प्लेसमेंट अधिकारी प्रा सचिन जाधव, इलेक्ट्रॉनिक्स व टेलीकमुनिकेशन विभाग प्रमुख प्रा नीता बाणखेले, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे