सरदार पटेल हायस्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनात १२६ प्रकल्प सादर
1 min readआणे दि.१३ :- सरदार पटेल हायस्कूल आणे मध्ये विज्ञान प्रदर्शनात १२६ प्रकल्प सादर करण्यात आले, विविध स्पर्धांमध्ये विद्यालयातील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अशी माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक धोंडिभाऊ शिंदे यांनी दिली.
बुधवार दि.१२ डिसेंबर रोजी सरदार पटेल हायस्कूल आणे (ता.जुन्नर) येथे शाखा स्तरीय विज्ञान, चित्रकला व रांगोळी प्रदर्शन तसेच निबंध, वक्तृव स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनाचे उद्घाटन पेमदरा गावच्या सरपंच जयश्री गाडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब दाते, उपाध्यक्ष विठ्ठल बेलकर,
सदस्य संजय आहेर, आरिफ इनामदार, बाबाजी आहेर, राजेंद्र नांगरे, बाळासाहेब आहेर, प्रशांत दाते, अजित आहेर, प्रताप गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र जाधव यांनी केले तसेच आभार तुषार आहेर यांनी मानले.