पालकांनी व शिक्षकांनी विशेष विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करावे:- गटविकास अधिकारी गरीबे

1 min read

जुन्नर दि.१२:- जिल्हा परिषद पुणे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे व पंचायत समिती जुन्नर शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग समता साप्ताह दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी तालुकास्तरावर साजरा करण्यात आला.

यावेळी दिव्यांग विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना मार्गदर्शन करत असताना विशेष विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करून त्यांना समाजात मानाचे स्थान निर्माण करून द्या. या विद्यार्थ्यांनाही निसर्गदत्त कला व कौशल्य येत असतात फक्त ते ओळखून त्यांचा विकास करणे गरजेचे आहे.

असे यावेळी गटविकास अधिकारी हेमंत गरीबे यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचे आयोजन शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय सभागृह जुन्नर येथे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी तालुक्यातील २१ दिव्यांग प्रकारातील ११९ विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी हेमंत गरीबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी शिक्षण विभाग अंतर्गत समावेशित शिक्षण विभागाकडून शैक्षणिक लाभ, आर्थिक लाभ, पालक व विद्यार्थी यांना समुपदेशन केले.

पालकांनी आपल्या पाल्यात काही कमी असल्याची भावना काढून टाकून बालकात आत्मविश्वास व सन्मान निर्माण करा असे यावेळी म्हंटले. याप्रसंगी जुन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी आपल्या मनोगतात शासनाने दिव्यांगासाठी शिक्षण, खेळ, नोकरी, तसेच विविध क्षेत्रात आरक्षण ठेवले आहे असे सांगितले.

समावेशित शिक्षणांतर्गत विविध शासकीय योजनांचा या सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. याबाबत समग्र शिक्षा अभियान समावेशित शिक्षण विभागातील कर्मचारी आपणाला योग्य मार्गदर्शन करतील. या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यांचा सर्वांगिण व्यक्तिमत्त्व विकास साधणे हा हेतू समोर ठेऊन सदर स्पर्धांचे आयोजन केल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमास शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी संचिता अभंग, सिंधू साळवे व विष्णू धोंडगे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालकांना मिष्टान्न भोजनाची व्यवस्था जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक रवींद्र वाजगे, अविनाश शिंगोटे व सचिन मुळे यांनी केला.

तर विद्यार्थ्यांना ट्रॉफी रोटरी क्लब नारायणगाव हायवे अध्यक्ष रवींद्र वाजगे यांनी दिल्या तर प्रमाणपत्र जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे संचालक अंबादास वामन यांनी दिले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व, रंगभरण, वेशभूषा व नृत्य स्पर्धा लहान व मोठ्या गटात आयोजित करण्यात आल्या होत्या.

दिव्यांग विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, रंगभरण, वेशभूषा व नृत्य स्पर्धा यातून प्रेक्षकांची मने जिंकून घेतली व त्यांच्यामध्ये एक नवीन उत्साह, आत्मविश्वास, आनंद निर्माण झाला. स्वतःला सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे यांचे सादरीकरण होते. पाहुण्यांनी याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. या स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, रवींद्र वाजगे,

अविनाश शिंगोटे, सचिन मुळे, रोटरी क्लब नारायणगावा हायवे व लोंढे यांचे हस्ते करण्यात आला. सर्व स्पर्धांच्या लहान व मोठ्या गटातील विजेत्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ, पंचम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व ट्रॉफी देवून गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाला डायट प्राचार्य शोभा खंदारे व वरिष्ठ अधिव्याख्याता बाळकृष्ण वाटेकर यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विशेष साधन व्यक्ती संगीता भुजबळ यांनी केले. तर कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन विशेष साधन व्यक्ती सुदेश तोरकडी, संगीता डोंगरे, सिमा मोरे, गडदे रोहिणी, मुंढे जयश्री,

विलास पिंगट यांनी केले. तर स्पर्धांचे परीक्षक म्हणून विषय साधन व्यक्ती तोरणे रवींद्र, अजय कानडे, साईनाथ कनिंगध्वज यांनी केले. कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्र संचालन विलास पिंगट यांनी केले. तर आभार प्रदर्शन सुदेश तोरकडी यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे