जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडीत बीटस्तरीय स्पर्धा उत्साहात संपन्न

1 min read

बेल्हे दि.१८:- जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०२३ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी (ता.जुन्नर) येथे बीटस्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. त्यामध्ये बेल्हे बीटमधील बेल्हे, अणे व निमगाव सावा या केंद्रातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन उपसरपंच राहूल बोरचटे, किसन बोरचटे, मोहन बांगर यांचे शुभहस्ते संपन्न झाले. त्यांचे समवेत बारकू बोरचटे, पाराजी बोरचटे, बापू वाघ, रामदास गुंजाळ, भाऊसाो गुंजाळ, शाळा समिती अध्यक्ष सतिश बोरचटे, उपाध्यक्ष मारुती बोरचटे मेजर, समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रसंगी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक सौजन्य गुंजाळवाडी गावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच नयना रामदास गुंजाळ यांनी दिले. स्पर्धकांना ट्रॉफी सौजन्य बांगरवाडी गावच्या सरपंच विमल बांगर यांनी दिले. तसेच उपस्थित सर्वांनाच लाडूचे सौजन्य उपसरपंच राहूल बोरचटे, तंटामुक्ती अध्यक्ष बबन गुंजाळ,उपाध्यक्ष बापू वाघ यांनी दिले.यावेळी बेल्हे बीटचे विस्तार अधिकारी मा.विष्णू धोंडगे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. केंद्रप्रमुख सोपान बेलकर यांनी स्पर्धा नियोजन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी गुंजाळवाडी शाळेचे शिक्षकवृंद पाटीलबुवा खामकर व तुकाराम खोडदे सर यांनी विशेष परिश्रम घेतले.या स्पधेच्या निमित्ताने बीटमधील केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक बहूसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी स्पर्धानिहाय विजेत्यांना व्यासपीठावर सन्मानित केले गेले. याप्रसंगी यजमान शाळेच्या वतीने सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे