मॉडर्नमध्ये वाचन संस्कृती जपणारा तास; ‘शांतता.. पुणेकर वाचत आहेत’ या उपक्रमास बेल्ह्यात प्रतिसाद

1 min read

बेल्हे दि.१९:- शांतता….पुणेकर वाचत आहेत उपक्रमात मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या ९२० विद्यार्थ्यांसह ४३ शिक्षकांनी सहभाग घेतला. बेल्हे येथील माळशेज निकेतनच्या मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या पटांगणावर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय पुस्तक न्यास, भारत सरकारचे शिक्षण मंत्रालय आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या निमित्ताने शांतता… पुणेकर वाचत आहेत या उपक्रमात सहभागी होऊन मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकाचे वाचन वाचन केले असल्याची माहिती मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या विद्या गाडगे यांनी दिली.

इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी पुस्तक आणि ग्रंथांची मैत्री करून वाचण्याची आवड निर्माण करणे अत्यावश्यक आहे.

त्यातूनच वाचन संस्कृती वृद्धिंगत होऊन उद्याचा सुजाण नागरिक घडण्यास मदत होणार असून दररोज मुलांनी एक तास वाचन करावे.

यामध्ये गोष्टीची पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके यांचे शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अवांतर वाचन करणे गरजेचे आहे. मोबाईलच्या युगात विद्यार्थ्यांचे वाचनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

विद्यार्थ्यांनी वाचण्याची आवड निर्माण केल्यास त्यांच्या ज्ञानात भर पडून सर्वांगीण विकास होण्यास मदत होणार असल्याचे प्राचार्या विद्या गाडगे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले.

वाचन संस्कृती जपणारा तास या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन सीए सावकार गुंजाळ, सीईओ शैलेश ढवळे, विश्वस्त दावला कणसे, सर्व संचालक मंडळाने कौतुक केले. या उपक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य के. पी. सिंग यांनी केले या उपक्रमात मॉडर्न इंग्लिश स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे