आळे येथील ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रम

1 min read

आळे दि. २० :- आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ आळे, संतवाडी, कोळवाडी संचलित ज्ञान मंदिर कनिष्ठ महाविद्यालय चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला.

या प्रसंगी सकाळ सत्रात शेला पागोटे हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संतोष दिघे प्रसिद्ध उद्योजक तथा तज्ञ संचालक आळे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसा. उपस्थित होते.

पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख वक्ते म्हणून प्रदीप निफाडकर प्रसिद्ध गझलकार व जेष्ठ पत्रकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनामध्ये उच्च ध्येय ठेवा वेगळेपण सिद्ध करा याविषयी मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सिद्धेश दिलीप भुजबळ प्रसिद्ध उघोजक हे उपस्थित होते.

त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अजय कुहाडे, उपाध्यक्ष सौरभ डोके, मानद सचिव अर्जुन पाडेकर, खजिनदार अरुण हुलवळे, किशोर कुऱ्हाडे, जीवन शिंदे, बी.आर. सहाणे, बाबू कुऱ्हाडे, शिवाजी गुंजाळ, प्रदीप गुंजाळ, देविदास पाडेकर, सम्राट कुऱ्हाडे, रमेश कुऱ्हाडे, मारुती पाडेकर, नवनाथ निमसे,

अमर सहाणे दुपार सत्रात विविध गुणदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम नृत्य गायन एकांकिका इत्यादी सादरीकरण केले. या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. महेश शेजाळ पशुधन विकास अधिकारी जुन्नर तालुका हे उपस्थित होते.

या वेळी विद्यार्थांनी नृत्य, ड्रामा, एकांकिका विविध कला सादर केल्या. बक्षीस वितरण समारंभात शालेय क्रीडा स्पर्धेत यशस्वी विद्यार्थी तसेच शैक्षणिक परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भवारी एस. एस, सूत्रसंचालन लांडगे एम.डी, जाधव स्मिता, जी.एम.औटी तर आभार सुरेश कुऱ्हाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे