समर्थ फार्मसीच्या खेळाडूंचे क्रीडा स्पर्धेत यश; चार खेळाडूंची विभागीय स्पर्धेसाठी निवड
1 min readबेल्हे दि.२१:- क्रीडा क्षेत्रामध्ये समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी सातत्याने भरीव योगदान देत आहेत. तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेबरोबरच जिल्हास्तरीय, विभागस्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये देखील समर्थ संकुलातील विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान कामगिरी बजावलेली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल विद्यापीठ लोणेरे अंतर्गत नुकत्याच झालेल्या पुणे झोनल बास्केटबॉल व खो खो स्पर्धेमध्ये समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे मधील विद्यार्थ्यांनी यशस्वी कामगिरी बजावली. तसेच आंतरविभागीय स्पर्धेसाठी पुणे विभागीय संघामध्ये सदर विद्यार्थ्यांची निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हातपक्की यांनी दिली.
तसेच समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील रोशन केंगळे या विद्यार्थ्यांची कबड्डी या स्पर्धेसाठी पुणे विभागीय संघामध्ये निवड झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. संतोष घुले यांनी दिली.बी फार्मसी च्या तृतीय वर्षामध्ये शिकत असलेल्या तन्मय खोकराळे या विद्यार्थ्यांची बास्केटबॉल संघांसाठी तर सोमनाथ नरसाळे व ओंकार ढाकणे या विद्यार्थ्यांची खो-खो संघांमध्ये स्पर्धेसाठी निवड करण्यात आल्याची माहिती क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी दिली.
या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक डॉ. राजाभाऊ ढोबळे, प्रा.सचिन भालेकर, प्रा.सौरभ डुमणे, प्रा.किरण वाघ, प्रा.ज्ञानेश्वर जाधव यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.