जुन्नर तालुक्यातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार
1 min readनारायणगाव दि.२३:- जिल्हा परिषद, पुणे आणि पंचायत समिती (शिक्षण विभाग), जुन्नर यांच्यावतीने आयोजित गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा (सन २०२३-२४) आज संपन्न झाला असून या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून आमदार अतुल बेनके हे उपस्थित होतो.
कलासागर मंगल कार्यालय, वारूळवाडी (ता.जुन्नर) याठिकाणी हा कार्यक्रम शनिवार दि.२३ रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
या शैक्षणिक वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन यावेळी गौरविण्यात आले. अभ्यासू आणि गुणवत्तापूर्ण शिक्षक हा शिक्षण क्षेत्राचा तसेच देशाच्या भविष्याचा मुख्य स्तंभ आहे.
चांगले विद्यार्थी म्हणजेच देशाचे भवितव्य घडविण्यासाठी आणि चांगला समाज घडविण्यासाठी शिक्षक हा एक महत्वाचा घटक असल्याचं आमदार बेनके यांनी बोलताना सांगितले. या कार्यक्रम प्रसंगी पुरस्कार मिळालेल्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन बेनके यांनी केले.
यावेळी समवेत अनिलतात्या मेहेर, विकास दरेकर, प्रकाश पाटे, अशोक घोलप यांसह विविध मान्यवर, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.