समर्थ लॉ कॉलेज मध्ये जुन्नर बार कौन्सिलच्या नूतन कार्यकारणीचा सन्मान सोहळा संपन्न

1 min read

बेल्हे दि.२४:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेज बेल्हे यांच्या वतीने नुकताच जुन्नर तालुका बार असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारणी सदस्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.

जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन कार्यकारिणीचे अध्यक्ष ॲड.हेमंत किसनराव भास्कर, उपाध्यक्ष ॲड. समीर बाळासाहेब पुरवंत, उपाध्यक्ष ॲड. हेमंत यशवंत हाडवळे, सेक्रेटरी ॲड.आशिषकुमार नारायण वानखेडे,

सहसेक्रेटरी ॲड.वृषाली हरिश्चंद्र वाळुंज, खजिनदार ॲड.विनय मारुती ढमढेरे, ग्रंथपाल ॲड.समकित सुनील नानावटी, ऑडिटर डिंपल सोपान थेटे-घाडगे, सदस्य ॲड.प्रवीण पंढरीनाथ मदगुले, सदस्य ॲड.सिद्धेश दादासाहेब वाघुले आदि मान्यवर उपस्थित होते.

जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन चे मा.उपाध्यक्ष व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट चे सल्लागार ॲडव्होकेट सुधीर कोकाटे यांनी सर्व कार्यकारिणी मंडळातील सदस्यांची ओळख करून दिली.जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन चे उपाध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत हाडवळे यांनी विद्यार्थ्यांना वकील क्षेत्रातील करिअर विषयी मार्गदर्शन करत.

एखाद्या केसची माहिती न्यायालयासमोर सादर करताना कशा पद्धतीने मुद्देसूद मांडणी करायला हवी याबाबत मार्गदर्शन केले.लॉ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या विविध संधींचे मार्गदर्शन करताना जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट हेमंत भास्कर म्हणाले.

की वकील झाल्यानंतर आपण फक्त कोर्टामध्ये जाऊन केस लढवणे एवढ्या पुरतेच वकिली क्षेत्र मर्यादित नसून त्याचबरोबर एमपीएससी, यूपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून सरकारी वकील, न्यायाधीश, खाजगी कंपन्यांमध्ये कायदेविषयक सल्लागार, तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये वकील हे पद तितकेच महत्त्वाचे असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

हे लॉ कॉलेज जुन्नर तालुक्यातील एकमेव महाविद्यालय असून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीचे ज्ञान हे अपडेट करायला हवे. विद्यार्थ्यांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन किंवा केस स्टडी साठी असोसिएशन च्या माध्यमातून सदैव सहकार्य करू. या महाविद्यालयातून खऱ्या अर्थाने वकील घडतील व संस्थेचे नाव उज्ज्वल करतील असा आशावाद यावेळी व्यक्त केला.

वकील होण्यासाठी आपल्याला सर्वच क्षेत्रातील ज्ञान आवश्यक आहे. संवाद कौशल्य, संभाषण कौशल्य तर हवेचं पण त्यासोबत उत्तम सादरीकरण खूप महत्त्वाचे असल्याचे ॲडव्होकेट भास्कर म्हणाले.संस्थेच्या वतीने जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन कार्यकारिणी मंडळातील उपस्थित पदाधिकाऱ्यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, लॉ कॉलेज चे उपप्राचार्य प्रा.प्रकाश कडलग, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार प्रा. प्रकाश कडलग यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे