गुळुंचवाडी शाळेचे उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर जाधव तालुका गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित

1 min read

नारायणगाव दि.२५:- पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर आयोजित सन 23-24 चा जुन्नर तालुका गुणवंत शिक्षक पुरस्कार गुळुंचवाडी शाळेतील उपक्रमशील शिक्षक ज्ञानेश्वर जाधव यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने नारायणगाव येथील कलासागर मंगल कार्यालयात करण्यात आले होते. ज्ञानेश्वर जाधव हे गेल्या सोळा वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नोकरीची सुरूवात अतिदुर्गम अशा वेल्हे तालुक्यात 2007 साली झाली.

एक वर्षे त्यांनी वेल्हे तालुक्यात जि.प. प्राथमिक शाळा सणसवाडी व जि. प. प्राथमिक शाळा सोंडे माथना येथे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले.सन 2018 च्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत जुन्नर तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा गुळुंचवाडी येथे हजर झाले.

गेल्या पाच वर्षांपासून गुळुंचवाडी शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवून व लोकसहभागाच्या माध्यमातून कार्य करत आहे. शाळा पूर्व तयारी मेळावे, बालआनंद मेळावा, परिसर भेट, आनंदी बाजार, दहीहंडी महोत्सव,स्पर्धा परीक्षा तयारी,स्नेहसंमेलन, आजी -आजोबा दिन,

शैक्षणिक सहल, कला -क्रीडा स्पर्धा अशा विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. याकामी त्यांना आणे केंद्राच्या केंद्रप्रमुख सविता कुऱ्हाडे, शाळेचे मुख्याध्यापक दौलत बांगर, सहकारी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांचे मोलाचे मार्गदर्शन, सहकार्य, प्रेरणा, पाठिंबा व पाठबळ लाभले.

पुरस्काराला उत्तर देताना ज्ञानेश्वर जाधव यांनी म्हटले की, ‘पुरस्कार प्रेरणा देतात. प्रेरणेने राष्ट्र मोठे होते.’ हा पुरस्कार मिळाल्याने मला आनंद होत असून, आता माझी जबाबदारी आणखी वाढली असून हा पुरस्कार आणखी काम करण्याची प्रेरणा देईल.

केवळ प्रतिनिधिक स्वरूपात मला मिळाला असला तरी हा सम्मान सर्व शिक्षकांचा आहे. जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, सागर कोल्हे, गटविकास अधिकारी हेमंत गरीबे, सहाय्यक गटविकास अधिकारी निलेश बुधवंत, गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे या मान्यवरांच्या उपस्थितीत व शुभहस्ते हा सोहळा पार पडला.

या निवडीबद्दल जुन्नर तालुका प्राथमिक संघांचे अध्यक्ष रमाकांत कवडे, जिल्हा सरचिटणीस खंडेराव ढोबळे, माजी अध्यक्ष विकास मटाले, सरचिटणीस प्रभाकर दिघे, वैभव सदकाळ, सभापती विजय लोखंडे, उपसभापती दत्ता घोडे,अशोक बांगर,संचालक सुभाष दाते,राहुल पडवळ,शाळा व्यवस्थापन समिती गुळुंचवाडी अध्यक्ष रंगनाथ भांबेरे,

मा. सरपंच वैशाली गुंजाळ, निमगाव घाणा गावचे सरपंच संजय पाटील, चेअरमन धोंडिभाऊ रुपनर, चंचल गुंजाळ, सुषमा भांबेरे, जिजाभाऊ काळे, दत्तात्रय भांबेरे, सुरेश रुपनर, विठ्ठल खिलारी, संभाजी रुपनर, रोहन घोडके, सावळेराम रुपनर, शांताराम भांबेरे, अनिल बांगर,

आणे केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक, ग्रामस्थ, तालुक्यातील शिक्षक मित्रपरिवार यांनी उपस्थित राहून ज्ञानेश्वर जाधव यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या पुरस्कारसाठी निवड केल्याबद्दल पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, केंद्रप्रमुख सविता कुऱ्हाडे,मा. मुख्याध्यापक दौलत बांगर यांचे त्यांनी आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे