हॉटेल बांधकामाचे स्टील चोरी करणाऱ्या आरोपीच्या आळेफाटा पोलीसांनी आवळल्या मुसक्या

1 min read

आळेफाटा दि.१६:- वडगाव आनंद ता. जुन्नर जि. पुणे गावचे हद्दीत आळेफाटा बायपास येथे लंबोदर हॉटेलच्या विरूध्द बाजूला एप्रिल महिन्यात पुणे बाजुकडे जाणाऱ्या रोडच्या कडेला फिर्यादी निखील संभाजी कुऱ्हाडे (वय २७ वर्षे रा. बोरी रोड आळे ता. जुन्नर जि.पुणे) यांचे हॉटेलचे बांधकाम चालू असलेल्या ठिकाणावरून एकुण ३,०३,३५८/- रू किंमतीचे स्टीलच्या मटेरीयलचे बंडल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेबाबत आळेफाटा पोलीस स्टेशन गु.र.नं १०३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे दि.२०/०४/२०२५ रोजी गुन्हा दाखल होता.सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी आळेफाटा पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकास सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने सुचना केल्या होत्या.त्याप्रमाणे गुन्हे शोध पथक हे नमुद गुन्हयाचा तपास करीत असताना, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी नामे संजय कंतु यादव व त्याचे साथीदारांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आळेफाटा पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने मौजे भटवाडी, सिन्नर जि. नाशिक येथे सापळा रचून आरोपी संजय कंतु यादव यांस अत्यंत शिताफीने ताब्यात घेवून सदर आरोपीकडून गुन्हयात वापरलेली टाटा कंपनीची आयशर MH 17 CV 2633 ही गाडी गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आली आहे. आरोपी संजय कंतु यादव याने गुन्हयातील मुद्देमाल चोरी करून विकला असून मुद्देमाल विकीतून आलेले पैसे हे लपवून ठेवल्याचे सांगितल्याने सदरची रक्कम रूपये २,२५,०००/- ही जप्त करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील इतर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम चालू आहे.सदर आरोपींकडुन टाटा कंपनीची आयशर MH 17 CV 2633 तसेच रोख रक्कम २,२५,०००/- असा एकुण १२,२५,०००/- रू (बारा लाख पंचविस हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल गुन्हयाचे तपासकामी जप्त करण्यात आला आहे.सदरची कामगिरी हि संदिप सिंह गिल्ल पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, रमेश चोपडे अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, रविंद्र चौधर उपविभागीय पोलीस अधिकारी जुन्नर विभाग, अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक, स्था.गु. शाखा, पुणे ग्रा. यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पो.हवा भिमा लोंढे, विनोद गायकवाड, पंकज पारखे, अमित मालुंजे, पो. कॉ नविन अरगडे, ओंकार खुणे, गणेश जगताप, म. पो.कॉ दिपाली फटांगरे यांनी केली आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे