विद्यानिकेतन पी. एम. हायस्कूल, साकोरी शाळेस तालुकास्तरीय गुणवंत शाळा पुरस्कार प्राप्त

1 min read

साकोरी दि.२६:- सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील शंभर टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा राखणाऱ्या शाळांना जुन्नर तालुका शिक्षक- पालक संघ, लायन्स क्लब ऑफ जुन्नर -शिवनेरी तसेच जय हिंद शैक्षणिक संकुल, कुरण (ता.जुन्नर) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत शाळा पुरस्कार विद्यानिकेतन पी. एम. हायस्कूल साकोरी या शाळेस देण्यात आला. ज्येष्ठ शिक्षण तज्ञ गुरुवर्य वि. वि.चिपळूणकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ तालुकास्तरीय गुणवंत शाळा व गुणवंत शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे