ज्ञानोबा, तुकाराम व रामकृष्ण हरीच्या जयघोषात बाबाजी चैतन्य महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
1 min read
ओतूर दि.१६:- ज्ञानोबा तुकाराम, राम कृष्ण हरीच्या जयघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज यांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराज यांच्या पायी पालखीचे ओतूर (ता. जुन्नर) येथून पंढरपूरला आषाढी वारीसाठी शनिवारी (दि. १४) प्रस्थान झाले असल्याची माहिती पालखी सोहळा वारकरी संत सेवा समिती ओतूरचे अध्यक्ष आत्माराम गाढवे व सचिव अनिल तांबे यांनी दिली.संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराजांची ओतूर येथे संजीवन समाधी आहे. यामुळे ओतूर ग्रामस्थांच्या सहकायनि जाणाऱ्या या पालखीला पंढरपूर पायी वारी सोहळ्यात मानाचे स्थान असून या सोहळ्याचे हे ६५ वे वर्ष आहे.
शनिवारी (दि. १४) रोजी या पालखी सोहळ्यास सद्गुरू बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरापासून सुरुवात झाली. ओतूर पोलिसांकडून सहायक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी पोलीस ठाण्यासमोर पालखी सोहळ्याचे स्वागत केले.
त्यानंतर नगर प्रदक्षिणा घालून पालखीचा पहिला मुक्काम शहरातील मुख्य चौक पांढरी मारूती मंदिरात झाला.त्यानंतर रविवारी सकाळी शंकर भगवंत डुंबरे यांनी सपत्नीक पालखीची पूजा केली. नंतर पालखीची भव्य मिरवणूक निघाली. यात आंबी दुमाला व जयमल्हार (संगमनेर) टाळ पथक, घोलवड येथील लेझीम पथकाचा सहभाग होता.
पालखी सोहळ्यात संस्थापक महादेव तांबे, रघुनाथ तांबे, विलास घुले, ज्ञानेश्वर पानसरे, सीताराम डुंबरे, शांताराम पानसरे,शांताराम महाराज वायकर, सरपंच छाया तांबे, प्रशांत डुंबरे, वैभव तांबे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले,
विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक घनंजय डुंबरे, शरद बँकेचे संचालक विनायक तांबे, अनिल डुंबरे, गंगाराम डुंबरे, वैशाली शेलार, आशा डुंबरे, सुनील डुंबरे सहभागी झाले होते.हा पायी पालखी ओतूर, आळे, बेल्हा, पाडळी, लोणी मावळा, रांधे दरोडी फाटा, वडझिरे, पारनेर, पाणोली घाट, पिंपळनेर,
राळेगण सिद्धी, ढवळगाव, उक्कडगाव, बेलवंडी, श्रीगोंदा, घोडेगाव, चांदगाव, टाकळी, जलालपूर, सिद्धटेक, बेडर्डी, सिध्दटेक, बारडगाव, येसवडी, राशीन, कोर्टी, विहाळ, वीट, झरे, वांगी कविटगाव, कंदर, टेंभुर्णी, अरण, मोडलिंब, आष्टी, बाबळगाव मार्गे पालखी गुरुवारी (३ जुलै) पंढरपूर येथे दाखल होणार आहे.