शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर १ चा लोकनृत्य स्पर्धेत १ नंबर
1 min read
बोरी दि.२७:- दत्तजयंती निमित्त बोरी (ता.जुन्नर) या ठिकाणी लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नं १ शाळेने लहान गटात भाग घेत आदिवासी लोकनृत्य सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेमध्ये या गीताला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त झाले. सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक व पाच हजार रुपये रोख असे बक्षीस याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते शाळेला देण्यात आली. लोकनृत्य स्पर्धेत सहभाग घेत मुलांच्या कलागुणांना वाव दिलेबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा सुप्रिया बांगर उपाध्यक्ष सोयल बेपारी , वैशाली मटाले, मनिषा बांगर, शेखर पिंगट.
संतोष पाबळे, दादाभाऊ मुलमुले या सर्वांनी मार्गदर्शक शिक्षक सुवर्णा गाढवे, प्रविणा नायकोडी , योगिता जाधव, कविता सहाणे, अंजना चौरे, सुषमा गाडेकर व मुख्याध्यापिका मिरा बेलकर यांचे अभिनंदन केले.पालक व ग्रामस्थांनी या यशाबद्दल सर्वांचे कौतुक केले.