कोकणात मुसळधार पाऊस सुरू; मुंबई-ठाण्याला रेड अलर्ट; अनेक गावांचा संपर्क तुटला

1 min read

मुंबई दि.१७:- मान्सूनने कोकणाचा संपूर्ण भाग व्यापला असून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भाग मान्सूनची एन्ट्री झाल्याचं दिसून आलं आहे. राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली असून पुढील तीन तासांसाठी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास चारही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचसोबत संपूर्ण कोकणमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पुढील दोन ते तीन दिवस मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण कोकणात जोरदार पाऊस सुरू आहे असून अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, घाट परिसरातून जाताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गासाठी ऑरेंज अलर्ट असून काही ठिकाणी 100 मिमीहून अधिक पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अमरावती, गोंदिया, भंडारा आणि नागपुरात देखील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर सातारा आणि पुण्यातील घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून काही तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर कोकणातील काही भागात काल अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दक्षिण गुजरात परिसरात पुढील 24 तासात कमी दाबाचे क्षेत्र तयार होणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला सोमवारी पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला. रविवारी रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु आहे. या मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीला पूर आला असून राजवाडी गावातील सोमेश्वर मंदिर पाण्याखाली गेलं. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर फणसवणे, कळंबस्ते, नायरी, शृंगारपूर या गावांचा गावांचा संपर्क तुटला आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती पाण्याच्या प्रवाहात गेली वाहून गेली आहे. डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे परशुराम घाटातील गॅबियन वॉल ढासळण्याची भीती वर्तवण्यात येते. परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला असून. परशुराम घाटातील समस्येवर उपाययोजना करण्यात करण्याची मागणी करण्यात येते आहे. राजापूर शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. अर्जुना आणि कोदवली या नदीच्या संगमावरती असलेल्या राजापूर शहरातला जवाहर चौकापर्यंत पुराचं पाणी आलं आहे. मागच्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!