विद्यानिकेतन स्कूल बोटा येथे विठ्ठल नामाची शाळा;ज्ञानोबा-माउली- तुकारामाचा गजर

1 min read

बोटा दि.२५:- विद्यानिकेतन इंटरनॅशनल अकॅडमी बोटा (ता.संगमनेर) या शाळेमध्ये आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून दिंडी काढली. यावेळी ज्ञानोबा-माउली-तुकारामाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समितीच्या अध्यक्षा डॉ. विद्या पाटील, सल्लागार डॉ. बी.जी.शेखर पाटील, कॅम्पस डायरेक्टर दीपक राहणे, मुख्याध्यापक सुनिता कडपा, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. मुळजकर आर.एम., फार्मसी चे प्राचार्य डॉ. के.के.शिंदे,MBA & MCA चे प्राचार्य डॉ. पवार एस.बी. व ITI प्राचार्य इंजि.अभंग व सर्व सर्व शिक्षक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते पांडुरंगाची आरती व पालखीचे पूजन करण्यात आले. या दिंडीमध्ये श्री विठ्ठला ची भूमिका राम अशोक कोरके व रुक्मिणी आरोही किरण गोखले या विद्यार्थ्यांनी सादर केली.यावेळी मुख्याध्यापक यांच्या हस्ते विठ्ठलाच्या पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. यावेळी प्राचार्या सुनिता कडपा यांनी संतांची माहिती सांगितली. त्याचबरोबर शाळेच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रा.सोनाली भालेराव यांच्या मार्गदर्शनाने विठ्ठल भक्ती गीतावर शालेय विद्यार्थिनींनी नृत्य केले.शाळेच्या परिसरा मध्ये असलेल्या श्री साईबाबा मंदिरामध्ये आरती झाली व सर्व विद्यार्थ्यांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!