मेजर गणेश गुंजाळ यांनी शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना दिली शैक्षणिक साहित्याची अनमोल भेट

1 min read

गुंजाळवाडी दि.१७:- शाळेच्या पहिल्या दिवशी दातृत्व संपन्न व्यक्तिमत्त्व मेजर गणेश सोनभाऊ गुंजाळ यांनी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. त्यामध्ये शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांला दर्जेदार स्कूल बॅग, 30 डझन वह्या व शैक्षणिक साहित्य लेखन किट असे एकंदर 30 हजार रुपये किंमतीचे साहित्य देण्यात आले. त्यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या इयत्ता पहिलीच्या मुलांचे औक्षण करून फुगे देऊन स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर शासनामार्फत देण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा आनंद गुंजाळ ,माजी तंटामुक्ती अध्यक्ष बबन गुंजाळ , महिला लोकनियुक्त सरपंच नयना गुंजाळ यांनी दिल्या.नव्याने शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या इयत्ता पहिली पासूनच्या CBSE अभ्याक्रम राबविण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक खामकर यांनी प्रास्ताविक करताना सांगितले. सर्व वक्त्यांनी आपल्या शुभेच्छा देत असताना शाळेच्या पटसंख्या वाढविण्यासाठी तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक खामकर यांनी केले तर आभार तुकाराम खोडदे सर यांनी मानले.प्रवेश उत्सव कार्यक्रमासाठी गुंजाळवाडी गावच्या लोकनियुक्त महिला सरपंच नयना रामदास गुंजाळ माजी उपसरपंच किसन बोरचटे , माजी तंटामुक्ती अध्यक्ष बबन गुंजाळ,सामाजिक कार्यकर्ते रामदास गुंजाळ ,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सतिश बोरचटे, उपाध्यक्ष मारुती बोरचटे मेजर ,सर्व smc सदस्य, ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ गुंजाळ ,अनन्या तपासे,मेजर गणेश गुंजाळ,नितीन गुंजाळ,बाबाजी गुंजाळ ,सिताराम गुंजाळ ,रमेश कसबे ,जालिंदर गुंजाळ,चेअरमन शांताराम गुंजाळ, शिवाजी गुंजाळ, दिनकर औटी, सुनिल बोरचटे, भाऊसाहेब गुंजाळ,आनंद गुंजाळ,मंगेश गुंजाळ, अस्लम मुजावर,काशिद साहेब यांसह सर्व पालकवर्ग व ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.सर्वांनी शाळा प्रवेश उत्सवात उत्स्फूर्त सहभाग घेतला व कार्यक्रमाचा आनंद द्विगुणीत केला.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!