बेल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी ५० विद्यार्थी नव्याने दाखल; ग्रामस्थांकडून शाळेचे कौतुक

1 min read

बेल्हे दि.१७:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेल्हे नंबर- १ शाळेत इयत्ता पहिली मध्ये दाखल नवीन विद्यार्थ्यांचा स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.या प्रसंगी प्रभात फेरीचे आयोजन नवीन विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले इत्यादींची वेशभूषा साकारत चिमुकल्यांनी पालकांचे लक्ष वेधले. ग्रामपंचायत सदस्या मंदा नायकोडी, कमल घोडे यांनी प्रभात फेरीत सहभाग घेतला.त्यानंतर नवीन विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.नवीन पाठ्यपुस्तकांचे वितरण बेल्हे गावचे सरपंच मनीषा डावखर, उपसरपंच राजेंद्र पिंगट, माजी उपसरपंच निलेश कणसे,प्रदीप पिंगट,सचिन बनकर,बडू गटकळ, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादाभाऊ मुलमुले,उपाध्यक्ष सोहेल बेपारी ,सदस्य प्रीतम मुंजाळ, शिक्षण तज्ञ विलास पिंगट, वैशाली मटाले, शितल गुंजाळ, शेखर पिंगट इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी नवीन मुलांना शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देत असताना शाळेच्या पहिल्याच दिवशी 50 विद्यार्थी नव्याने दाखल झाले असल्याने शाळेच्या मुख्याध्यपिका मीरा बेलकर, उपशिक्षक हरिदास घोडे,सुवर्णा गाढवे,क कविता सहाणे, संतोष डुकरे, प्रवीणा नाईकवाडी, योगिता जाधव, सुषमा गाडेकर अंजना चौरे या सर्वांचे अभिनंदन केले.तसेच शाळेला लागणाऱ्या भौतिक गरजाबाबत कटिबद्ध असल्याचे सांगितले.नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने स्व. भागुजी रामभाऊ शिरतर यांचे स्मरणार्थ विनायक भागुजी शिरतर व संजय भागुजी शिरतर यांच्याकडून कलर प्रिंटर शाळेला दिल्याबद्दल रोहिदास पाबळे यांचा शाळेच्या वतीने सन्मान करण्यात आला. शालेय व्यवस्थापन समिती सदस्या वैशाली मटाले यांची तालुकास्तरीय शिक्षण समिती वर निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान याप्रसंगी करण्यात आला.नवागातांच्या स्वागताच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून शाळेला शुभेच्छा दिल्याबद्दल मुख्याध्यापिका मिरा बेलकर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. बेल्हे केंद्राचे केंद्रप्रमुख सोपान बेलकर विस्ताराधिकारी विष्णू धोंडगे यांनी नवीन दाखल विद्यार्थ्यांबद्दल समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!