आळेफाटा पोलीस ठाण्याचा पोलीस निरीक्षक पदी विश्वास जाधव यांची नियुक्ती

1 min read

बेल्हे दि.१७:- आळेफाटा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी विश्वास जाधव यांची नियुक्ती झाली आहे. विश्वास जाधव यांनी शनिवारी रात्री उशिरा पोलिस निरीक्षक पदाचा पदभार घेतला. विश्वास जाधव हे या आधी पुणे एसपी ऑफीस येथे अनैतिक मानवी वाहतूक विभागात कार्यरत होते. त्याआधी गडचिरोली येथे तीन वर्ष त्यांनी पोलिस निरीक्षक पदी कार्य केले. गुन्हेगारी प्रवृत्तीला कायदेशीर पायबंदी घातली जाणार तसेच चोरी व महिला वरील अत्याचार खपून घेतले जाणार नसून अशा व्यक्तींवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल. तसेच सण उत्सवांच्या काळात शासकीय नियमांचे पालन न केल्यास तात्काळ कारवाई करण्यात येईल. रस्ते अपघात रोखण्यासाठी उपाय योजना व जागृती केली जाईल. तसेच सामाजिक सलोखा राखण्याचं काम केले जाईल. असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यावर सहायक पोलिस निरीक्षक अनिल पवार, सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर, सहायक पोलिस निरीक्षक विनोद दुर्वे, सहायक पोलिस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलिस निरीक्षक चंद्रा डुंबरे, तसेच सर्व पोलिस स्टाफ ने जाधव यांचे स्वागत करून सत्कार केला.


 

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!