सुभाष मोहरे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित तर उच्छिल शाळेचा परसबाग स्पर्धेत सन्मानचिन्ह देऊन गौरव

1 min read

जुन्नर दि.२७:- (प्रतिनिधी : प्रा.सतिश शिंदे) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल येथील पदवीधर शिक्षक व जिल्हाध्यक्ष अखिल पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ आणि आदर्श शिक्षक सुभाष अरुण मोहरे यांना जुन्नर तालुका शिक्षक- पालक संघ व लायन्स ब्लब ऑफ जुन्नर शिवनेरी आणि जयहिंद शैक्षणिक संकूल कुरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात उच्च शैक्षणिक पात्रता व त्यांनी आतापर्यंत केलेल्या विविध शाळांमधील कार्य आणि त्यांच्या शैक्षणिक उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार सन-२०२३ प्रदान करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेण्याद्री देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई , जयहिंद शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, जुन्नर तालुका जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. एकनाथ डोंगरे , लायन्स क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी अध्यक्ष योगेश रायकर, जुन्नर तालुका शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष रामभाऊ सातपुते. शिवनेरी लायन्स फांऊडेशनचे अध्यक्ष शिरिष जठार, शिक्षक पालक संघाचे सेक्रेटरी एफ.बी.आत्तार इत्यादी मान्यवरांसह प्राथमिक शिक्षकांमधून सात तर माध्यमिक शिक्षकांना सहा असे तेरा शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षकांना गौरविण्यात आले. तसेच ३७ शाळांना १००% दहावीचा निकाल लागलेल्या शाळांचाही गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला तालुक्यातील प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.परसबाग स्पर्धा सन-२०२२ अंतर्गत जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती जुन्नर आयोजित तालुक्यातील विविध शाळांमधील असणाऱ्या परसबागेची पाहणी केली असता. परसबागेतील भाजीपाल्याच्या शालेय पोषण आहारात वापर सेंद्रिय खतांचा वापर औषधी वनस्पती यांची लागवड सुंदर व आकर्षक परसबाग अशी पश्चिम आदिवासी भागातील एकमेक आदर्शवत शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्छिल यांना पर्यवेक्षण यंत्रणेद्वारे पाहणी करून तपासणी करण्यात आली व यामध्ये शाळेला द्वितीय क्रमांकाने सन्मानीत जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या आशा बुचके गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे, सहा.गटविकास अधिकारी बुध्यवंत इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र आणि रोख 3000/- रुपये देऊन शाळेचे मुख्याध्यापक अन्वर सय्यद सुभाष मोहरे स्मिता ढोबळे व लिलावती नांगरे आणि आरती मोहरे या शिक्षकांचा सर्वच पश्चिम भागाच्या वतीने तसेच शालेय व्यवस्थापन समिती आणि सर्व पालक यांच्या वतीने कौतूक करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे