समर्थ फार्मसी ची कल्याणी घोगरे पावर लिफ्टिंग मध्ये करणार विद्यापीठ संघांचे नेतृत्व
1 min readबेल्हे दि.२९:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे अंतर्गत नूतन कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च तळेगाव दाभाडे येथे नुकत्याच झालेल्या आंतर विभागीय पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये ५५ किलो वजनी गटामध्ये समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी. बेल्हे या पदवी औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रथम वर्षातील विद्यार्थिनी कल्याणी घोगरे हिने प्रथम क्रमांक मिळवल्याची माहिती प्राचार्य डॉ.बसवराज हतपक्की यांनी दिली.त्याचप्रमाणे समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे या पदवी औषध निर्माण शास्त्र महाविद्यालयातील पायल वरे या विद्यार्थिनीने ४५ किलो वजनी गटामध्ये आंतरविभागीय पावर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याची माहिती प्राचार्य डॉ. संतोष घुले यांनी दिली. सातत्यपूर्ण सराव व तज्ञांचे योग्य मार्गदर्शन त्याचबरोबर जिद्द,चिकाटी आणि मेहनत या सर्वांचा परिपाक म्हणूनच हे यश मिळाले असल्याचे कल्याणी घोगरे म्हणाली.
सदर विद्यार्थिनीची देशपातळीवर होणाऱ्या विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी विद्यापीठ संघामध्ये निवड झाल्याची माहिती क्रीडा शिक्षक डॉ.राजाभाऊ ढोबळे व प्रा.सचिन भालेकर यांनी दिली.या यशस्वी खेळाडूला क्रीडा संचालक एच पी नरसुडे, डॉ.राजाभाऊ ढोबळे, प्रा.राहुल लोखंडे व प्रा.सचिन भालेकर यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर, सर्व विभागातील प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.