व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी दंत तपासणी शिबिराचे आयोजन
1 min read
वडगाव कांदळी दि.१५:-विशाल जुन्नर सेवा मंडळ संचलित व्ही.जे इंटरनॅशनल स्कूल, वडगाव कांदळी येथे विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी आरोग्यवर्धक दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शाळेतील इयत्ता १ ली ते १० वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची निःशुल्क दंत तपासणी करण्यात आली.
या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री तांगतोडे यांनी विद्यार्थ्यांना आरोग्य आणि मुख – स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, नियमित दंत तपासणीचे फायदे समजावून सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, निगा आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण केली.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. त्यांनी प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना वेळेवर तपासणीसाठी सज्ज ठेवले. पालकांनाही यासंदर्भात माहिती देण्यात आली.
या उपक्रमासाठी विशाल जुन्नर सेवा मंडळाचे अध्यक्ष अंकुश सोनवणे आणि सीईओ दुष्यंत गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळेच असे उपक्रम सातत्याने शाळेमध्ये राबवले जात आहेत.
शिबिरात विद्यार्थ्यांना दातांची निगा कशी राखावी, कोणत्या सवयी टाळाव्यात, योग्य आहाराचा दातांवर होणारा प्रभाव याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. अनेक विद्यार्थ्यांनी पहिल्यांदाच दंत तपासणीचा अनुभव घेतला.
दंत तपासणी शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याबाबतची जाणीव वाढली असून, पालकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
