श्रीमती. इंदिरा गांधी हायस्कुलध्ये लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना श्रद्धांजली अर्पण
1 min readबेल्हे दि.१५:- श्रीमती. इंदिरा गांधी हायस्कुल (रानमळा, ता. जुन्नर) येथे शुक्रवार दि.१५ रोजी “लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल” यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जगताप एस. डी. सर हे होते. विद्यालयातील विद्यार्थी व ज्येष्ठ शिक्षिका माया माळवे व जयश्री थोरात यांनी सरदार पटेल यांच्या भारताच्या स्वातंत्र्य लढयातील महत्त्वपूर्ण कार्याविषयी माहिती सांगितली. सदर कार्यक्रमास विद्यालयातील उपशिक्षक संतोष कर्डक, औटी व पवार मॅडम तसेच लक्ष्मण गायकवाड़, सबाजी गुंजाळ, विलास गुंजाळ, विद्यार्थी, तसेच ग्रामस्थ आदि उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश मालुजंकर यांनी केले.