संत निरंकारी मिशन द्वारा आळेफाटा येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

1 min read

आळेफाटा दि.१५:- संत निरंकारी मिशन द्वारा आळेफाटा येथे रविवार १७ डिसेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. संत निरंकारी सत्संग भवन, चाळकवाडी टोलनाक्याजवळ सकाळी १० ते ४ या वेळामध्ये रक्तदान शिबिर संपन्न होईल. संत निरंकारी मिशनद्वारे मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजन केले जातात. ज्यात मुख्यतः स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, निःशुल्क आरोग्य तपासणी, नेत्र चिकित्सा शिबिर तसेच महिला सशक्तिकरण, बाल विकाससह नैसर्गिक संकटाच्या वेळी सहाय्यता यासारख्या अनेक कल्याणकारी समाज उपयोगी उपक्रम राबवले जातात. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे या उक्तीप्रमाणे सर्वांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आळेफाटा शाखेचे प्रमुख चंद्रकांत कुऱ्हाडे व संतोष कुऱ्हाडे यांनी केले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे