आणे ग्रापंचायतीच्या माध्यमातून ५० महिलांना वाहन चालवण्याचे मोफत प्रशिक्षण
1 min readआणे दि.१२:- ग्रामपंचायत आणे (ता.जुन्नर) या ठिकाणी चौदाव्या व पंधराव्या वित्त आयोगामार्फत महिला सबलीकरणसाठी गावातील ५० महिलांना वाहन प्रशिक्षण देण्यात येत आहे.
या संदर्भात दि.११ रोजी श्रीक्षेत्र आणे गावच्या लोकनियुक्त सरपंच प्रियंका दाते, उपसरपंच सुहास आहेर व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या संकल्पनेतून व पाठपुराव्याने आयोजित करण्यात आले.
सदर प्रशिक्षणास महिला वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून या प्रशिक्षणाचा आत्तापर्यंत प्रशिक्षणार्थी म्हणून ५० महिलांनी आपल्या नावाची नोंद केली. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला असून सदर प्रशिक्षणास सोमवार दि.११ रोजी उत्साहाने सुरुवात करण्यात आली.
हा प्रशिक्षण कालावधी 30 दिवसांचा असून या प्रशिक्षणामध्ये वाहन चालवण्याचा संपूर्ण प्रशिक्षण दोन बॅचमध्ये होणार आहे. यामुळे महिला वर्गात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
“एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करत असताना महिला सबलीकरण होणे फार गरजेचे आहे, महिलांना सफाईदारपणे वाहन चालवता येणे ही काळाची गरज बनलेली आहे, त्यामुळे सदर प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेले आहे.”
प्रियांका दाते, सरपंच आणे
“ग्रामपंचायतीने जे प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे, त्यामुळे प्रचंड आनंद झाला आहे. आम्ही सर्व उत्साहपूर्ण वातावरणात प्रशिक्षण घेत असून याचा फायदा आमच्या कुटुंबाला होणार आहे.
लोकनियुक्त सरपंच प्रियांका दाते यांच्या अभिनव संकल्पनेतून सुरू झालेला उपक्रम नक्कीच कौतुकास्पद असून आम्ही सर्व महिला त्यांचे व सर्व ग्रामपंचायत सहकाऱ्यांचे आभार मानतो.”
जुईली गवळी, प्रशिक्षण घेणारी महिला