वारुळवाडी रस्ताचे काम जलद गतीने पुर्ण करा:- प्रमोद खांडगे पाटील, शेतकरी संघटना

1 min read

नारायणगाव दि.१० :- वारुळवाडी रस्ताचे काम जलद गतीने पुर्ण करा पिंपळगाव आर्वी सावरगाव मार्गाने एस टी चालु करावी. अशी प्रमोद खांडगे पाटील तालुकाध्यक्ष आघाडी शेतकरी संघटना यांनी मागणी केली आहे.

वारुळवाडी सावरगाव येणारे रस्त्याचे काम बांधकाम विभागामार्फत चालू आहे परंतु सदर रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने चालू असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल मंचर, नारायणगाव बाजार समितीमध्ये नेण्यासाठी अडथळे निर्माण होत आहे व वारूळवाडी, चिमणवाडी, गुंजाळवाडी, पिंपळगाव, सावरगाव येथील विद्यार्थी गुरुवर्य रा.प. सबनीस विद्यामंदिर मध्ये शिकत आहेत.

परंतु वारूळवाडी मध्ये गेल्या दीड महिन्यापासून रस्त्याचे काम चालू आहे. त्यामुळे ह्या रस्त्याने स्कूल बस व शेती मालवाहतूक करणारी वाहने नेता येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेळेत पोहोचता येत नाही.

आपण आपल्या विभागामार्फत एस. टी महामंडळ नारायणगाव यांना पत्र द्यावे की नारायणगाव जुन्नर मार्गे आर्वी पिंपळगाव वडगाव साहणी सावरगाव येणारे एसटी चालू करण्यात यावी व वारळवाडी गुंजाळवाडी परिसरातील शेतकऱ्यांना पर्याय रस्ता तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करावे लागेल

याची सार्वजनिक बांधकाम उपविभाग जुन्नर यांनी नोंद घ्यावी.वारूळवाडी सावरगाव येणेरे रस्त्याचे काम चालू असल्यामुळे पर्यायी रस्त्या मार्गे एस.टी. सुरु करण्याबाबत. वारुळवाडी सावरगाव येणारे रस्त्याचे काम बांधकाम विभागामार्फत चालू आहे त्यामुळे ह्या रस्त्याने स्कूल बस व इतर वाहने नेता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वेळेत पोहोचता येत नाही.

त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आपण आपल्या विभागामार्फत एस टी महामंडळ नारायणगाव यांना पत्र द्यावे की नारायणगाव जुन्नर मार्गे आर्वी पिंपळगाव वडगाव साहणी सावरगाव येणारे एसटी चालू करण्यात यावी व वारुळवाडी गुंजाळवाडी परिसरातील शेतकऱ्यांना पर्याय रस्ता तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अन्यथा शेतकरी संघटनेला आंदोलन करावे लागेल याची सार्वजनिक बांधकाम उपविभाग जुन्नर यांनी नोंद घ्यावी.

उपविभागीय अभियंता नारायणगाव व एस टी महामंडळ आगार प्रमुख यांना असा इशारा आघाडी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रमोद खांडगे पाटील यांनी दिला. यावेळी सामिजिक कार्यकर्ते विश्वास खांडगे यमाई देवस्थानचे अध्यक्ष गोरक्ष खांडगे यमाई देवस्थानचे उपअध्यक्ष वैभव खिलारी सगुनभाऊ ढवळे व शेतकरी व पालक उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे