श्री हॉस्पिटल मध्ये १७ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबीर 

1 min read

आळेफाटा दि.८ :- आळेफाटा (ता.जुन्नर) येथे श्री हॉस्पिटल मध्ये १७ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार दि.९ रोजी मोफत सर्व रोग निदान व शस्त्रक्रिया शिबीर आयोजित केले असून गरजू नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. सचिन शिंदे यांनी केले आहे.

या शिबिरात मणक्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे मुतखड्याच्या शस्त्रक्रिया, प्रोस्टेट ग्रंथीच्या शस्त्रक्रिया, फ्रॅक्चर, सांधे व हाडांच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जातील.

तसेच ऍन्जिओग्राफी केल्यानंतर ब्लॉकेज अढळल्यास एन्जोओप्लास्टी महात्मा ज्योतिराव फुले व जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत केली जाईल.

छातीत दुखणे, जुने हृदय विकार, धाप लागणे / दम लागणे, सुज येणे, छाती धडधडने, रूटीन चेक-अप, थकवा येणे, चक्कर येणे अशा व इतर सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले असून रुग्णांनी या शिबिराचा अवश्य लाभ घेऊन तपासणी करून घ्यावी.

या शिबिरात इ.सी.जी, हृदयरोग तज्ञांचा सल्ला,ब्लड शुगर, बीपी तपासणी मोफत केली जाणार आहे तसेच इतर लॅब तपासणीत ३० टक्के सूट मिळणार आहेत. तसेच गर्भाशयाच्या पिशवीचे दुर्बिणी द्वारे ऑपरेशन तसेच वंध्यत्व रुग्णांसाठी माफक दरात उपचार केले जातात. स्थळ – श्री हॉस्पिटल, नाशिक – पुणे रोड आळेफाटा ता.जुन्नर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे