जुन्नर – शिरूर रस्त्यासाठी हिवाळी अधिवेशनात ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर:- आमदार अतुल बेनके
1 min read
जुन्नर दि.७:- जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांच्या विशेष प्रयत्नातून जुन्नर- श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना- येडगाव- चौदा नंबर – नगद वाडी – भोरवाडी- सुलतानपूर- शिरोली – निमगाव सावा – औरंगपूर – पारगाव तर्फे आळे- पिंपरखेड हा रस्ता मंजूर झाला
असून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आज या रस्त्याच्या कामासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी दिली.
जुन्नर शिरूर तालुक्याला जोडणारा हा अत्यंत उपयोगी रस्ता आहे. विशेष म्हणजे श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता असून यामुळे शासकीय कामासाठी जुन्नरला जाण्या – येण्यासाठी जवळचा उत्तम दर्जाच्या रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. पारगाव (ता.जुन्नर) येथील कार्यक्रमात सदरचा रस्ता मंजूर करणारच अशी घोषणा आमदार अतुल बेनके यांनी २७ ऑगस्ट २०२१ रोजी केली होती.
हे काम मंजूर झाल्याबद्दल गुलाब नेहरकर, पल्लवी भोर, उज्वला पाचपुते, रामदास पवार, पंढरीनाथ डावखर, योगिता आतकरी, किशोर घोडे, बबन डुकरे, माया कामठे,
संभाजी चव्हाण, रेश्मा बोटकर, राजेश दाभाडे, प्रिया खिल्लारी, मंगेश खिल्लारी आधी पदाधिकाऱ्यांनी आमदार बेनके यांचे व माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांचे आभार मानले.