बोरी ते आळेगाव या रस्त्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार
1 min readआळेफाटा दि.७:- बोरी बुद्रुक ते आळेगाव रस्त्याची दुरावस्था झालेली असुन त्याची दुरूस्तीची मागणी ग्रामस्थांनी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने मागणीची दखल घेतली असुन सार्वजनिक बांधकाम पुणे विभागाचे
अभियंता जाधव यांनी बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) या ठिकाणी मंगळवार दि.५ रोजी भेट देऊन रस्त्याची पाहणी करून ठेकेदार ज्ञानेश्वर पाटील जाधव यांना सुचना देऊन सोमवार पासून काम करण्यास परवानगी दिली. तसेच यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग जुन्नरचे अभियंता बागले रावसाहेब हे ही उपस्थित होते.
हा रस्ता ५.५ मीटरचा असल्यामुळे रस्ता लगत ज्या शेतकऱ्यांच्या पाइपलाईन गेल्या आहेत त्या शेतकऱ्यांनी त्या स्थलांतरित करण्याच्या सुचना दिल्या आहेत. तरी संबंधित शेतकऱ्यानी यांची नोंद घ्यावी असे उपस्थित अधिका-यांनी यावेळी सांगितले.