श्री क्षेत्र भगवान गडावरील श्री ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिराच्या धर्तीवर होणार आळे येथील श्री क्षेत्र रेडा समाधी देवस्थानच्या विनामंडपाचे दगडी काम

1 min read

भगवान गड दि. १६:- श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट वेद बोलाविलेला श्री रेडा समाधी मंदिर श्री क्षेत्र आळे, संतवाडी, कोळवाडी या देवस्थानचा २०२४ कॅलेंडरचा (दिनदर्शिका) प्रकाशन सोहळा बीड जिल्ह्यातील श्री क्षेत्र भगवानगड येथील महंत श्री नामदेवजी महाराज शास्त्री यांच्या शुभहस्ते भगवानगडावर संपन्न झाला. श्री क्षेत्र भगवानगड येथे २५ कोटी रुपये खर्च करून श्री ज्ञानेश्वर माउलींच्या मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम चालू आहे. त्याच धर्तीवर आळे येथील रेडा समाधी देवस्थानच्या विनामंडपाचे दगडी काम करावायचे असल्यामुळे याबाबत करावायच्या सर्व कामाबाबत शास्त्री महाराजांनी मार्गदर्शन केले. महंत शास्त्री महाराज यांनी आपल्या देवस्थानच्या कामाचे कौतुक करून कॅलेंडर प्रकाशन सोहळा शुभस्ते संपन्न केला. यावेळी महाराजांचा सन्मान देवस्थानच्या वतीने करण्यात आला. तसेच शास्त्री महाराजांनी लवकरच आपण श्री रेडा समाधी मंदिरास भेट देणार असल्याचे सांगितले.यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे जिल्हा परिषद माजी सदस्य प्रसन्न डोके, संदीप निमसे (अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट) तसेच उपस्थित विश्वस्त मंडळ व आळे गावचे पदाधिकारी रविंद्र (चेअरमन ) गुंजाळ, चारूदत्त साबळे, कान्हू पाटील कुऱ्हाडे, संतोष पाडेकर, अमोल भुजबळ, बाळासाहेब जाधव, पांडुरंग डावखर, सुनील जाधव, गणेश शेळके, दिनकर राहिंज, संजय खंडागळे, पप्पू डोंगरे, पवन डोके, गणेश गुंजाळ हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी आळे देवस्थानची सर्व माहिती कान्हू पाटील कुऱ्हाडे यांनी दिली व आभार पांडुरंग डावखर यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे