अर्थसंपदा पतसंस्थेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायणवाडीतील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेंशाचे वाटप 

1 min read

नारायणगाव दि. ६:- अर्थसंपदा पतसंस्था नारायणगाव (ता. जुन्नर) परिवाराच्या वतीने बुधवार दि.६ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारायणवाडी येथील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेंशाचे वाटप करण्यात आले.

यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष विलास पानसरे, संचालक अनंत भोर, प्रकाश नेहरकर, निलेश रसाळ, ग्रामस्थ ज्ञानदेव पाटे, अरविंद पाटे, सागर पाटे, प्रविण पाटे, सागर वाजगे, योगेश पानसरे, मच्छिंद्र पानसरे, संदीप मेहेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

अर्थसंपदा नागरी सहकारी पतसंस्था गेले अनेक वर्षे पासून नारायणगाव व वारूळवाडी परिसरामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे.

आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळा ठाकरवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असेल क्रीडा साहित्य यांची मदत करत आहे.

येणाऱ्या काळामध्ये बाकीचेही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील मुलांसाठी अर्थसंपदा पतसंस्था परिवाराच्या माध्यमातून मदत करणार असल्याचं संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे