राजीव गांधी कॉलेज चे प्राचार्य डॉ. कृपाल पवार यांची पोस्ट- डॉक फेलोशिप इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी निवड

1 min read

कर्जुले हर्या दि.३०:- राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग कर्जुले हर्या (ता.पारनेर) चे प्राचार्य डॉ. कृपाल प्रभाकर पवार यांना मानाची समजली जाणारी श्रीनिवास युनिव्हर्सिटी (मेंगलोर) ची पोस्ट- डॉक फेलोशिप इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग यासाठी निवड झाली आहे.

त्यांचा संशोधनाचा विषय “एनालिसिस अँड ऑप्टिमायझेशन ऑफ रेसिड्युल स्ट्रेसेस ड्यूरिंग हार्ड टर्निंग ऑफ ए आय एस आय एम 2 टूल स्टील” हा आहे. त्यांच्या शोध कामासाठी त्यांना श्रीनिवास युनिव्हर्सिटी (मेंगलोर ) चे रिसर्च डायरेक्टर, डॉ.प्रवीण बी एम यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे